महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाच्या सुधारणेसाठी जे सुरुवातीपासून कार्यरत आहेत व जे काम करू इच्छितात अशा राज्य शासनाच्या सर्व विभागांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा शिखर परिषद ही संकल्पना योजली आहे.
या शिखर परिषदेमध्ये :
ही शिखर परिषद वातावरणीय बदल, शाश्वत विकास प्रयोजन (एसडीजी) आणि पर्यावरणाशी संबंधित अन्य उदयोन्मुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
शासकीय विभागांमध्ये समन्वयातून नवीन माहितीची देवाणघेवाण आणि त्यांचा प्रभावी सहभाग वाढवणे सुलभ केले जाईल.
सर्व शासकीय विभागांना त्यांची स्वतःची शाश्वत उद्दिष्ट्ये ओळखण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला जाईल.
यशोगाथा सामायिक करणे आणि क्षैतिज उपयोजन सक्षम केले जाईल.