माझी वसुंधरा

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग

महाराष्ट्र शासन

माझी वसुंधरा- अभियान

माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.
हे अभियान 2 ओक्टोबर, 2020 रोजी माननीय मंत्री - पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
curiculum
curiculum

माझी वसुंधरा- उद्दिष्टे

 • वेळीच आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने वेगवेगळे वातावरणीय बदल शमवण्या बाबत उपक्रमांमध्ये कार्यक्षम नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे.
 • प्रतिकृतीद्वारे शाश्वत वातावरणाकडे गतिशील आणि वाढीव / प्रमाणित उपाय ओळखणे.

माझी वसुंधरा- कृती आराखडा

 • भूमी (पृथ्वी)
  • ग्रीन कव्हर व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन.
  • घनकचरा व्यवस्थापन.
 • वायू (हवा)
  • हवा गुणवत्ता देखरेख आणि हवा प्रदूषण शमन.
 • जल (पाणी)
  • जलसंधारण.
  • पावसाच्या पाण्याची साठवण व पाझर.
  • जलाशय/नदीची साफसफाई व कायाकल्प.
  • सांडपाण्यावर प्रक्रिया.
 • अग्नी (ऊर्जा)
  • नूतनीकरणयोग्य ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहित करणे.
 • आकाश (अवकाश)
  • पर्यावरण सुधारणा व संरक्षणाविषयी जागरूकता.
  • एक हरित कायदा (वन ग्रीन ॲक्ट) पाळण्यासाठी नागरिकांनी घेतलेले वचन .

माझी वसुंधरा अभियान – प्रथम वर्ष लक्ष्य गट

 • नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
  • अमृत शहरे
  • नगर पालिका
  • नगर पंचायत
 • पंचायत राज संस्था

  १०००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्व गावे

माझी वसुंधरा अभियानामध्ये पहिल्या वर्षात महाराष्ट्रातील सुमारे सात कोटी नागरिकांना सामावून घेतले जाईल जी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून जास्त आहे.

माझी वसुंधरा अभियायन जीआर

Majhi Vasundhara Abhiyan Toolkit

 • हे टूलकिट पंचमहाभूत म्हणजे भूमी, वायु, जल, अग्नी व आकाश यांच्या आधारे विकसित केलेल्या दहाही सूचकांतर्गतच्या कृती क्षेत्रांची स्पष्ट व्याख्या करते.
 • हे टूलकिट प्रत्येक सूचक व उप-सूचकाला नियुक्त केलेल्या गुणांची व्याख्या करते.
 • हे टूलकिट विभागाला सादर करण्यासाठी आवश्यक मूल्यमापन प्रक्रियेची आणि कागदपत्रांची देखील व्याख्या करते.
 • यामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या काही संभाव्य योजनांचा देखील उल्लेख केलेला आहे ज्यांचा उपयोग माझी वसुंधरा सूचकांना साध्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.
मित्र परिवार कॉर्पोरेट्स : 331564 दिनांक : 20-09-2021