पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांनी माझी वसुंधरा अंतर्गत युनिसेफ आणि इतर सहाय्यक संस्थांसह शालेय मुलांमध्ये हरित मूल्ये रुजवण्याकरिता ‘माझी वसुंधरा अभ्यासक्रम’ हाती घेतला आहे.
जैवविविधता संवर्धन
घनकचरा व्यवस्थापन आणि वैयक्तिक आणि सामुदायिक आरोग्य.
जल संसाधन व्यवस्थापन.
ऊर्जा, वायू प्रदूषण आणि हवामान बदल
हा उपक्रम ३ डिसेंबर २०२० रोजी माननीय पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्री, महाराष्ट्र शासन, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) महाराष्ट्र, शहरी आणि पर्यावरण अभ्यास प्रादेशिक केंद्र (RCUES), अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG), मुंबई, पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE), पुणे आणि डोमेन तज्ञां सह भागीदार संस्थांच्या उपस्थितीत सुरू झाला.
अभ्यासक्रम पूर्ण झाला असुन लवकरच तो अमलात आणण्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या कडे सुपूर्द केला आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व युनिसेफ, पर्यावरण मंत्री मा. श्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री मा. श्री बनसोडे यांच्या उपस्थितीत.