माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागच्या वतीने राज्यातील पर्यावरणाच्या सुधारणेसाठी काम करणाऱ्या सर्व ना-नफा संस्थांना एकत्रित आणण्यासाठीचा उपक्रम आहे. उद्दिष्टे:
- समाजसेवी संस्थांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्था/पंचायत राज संस्थांशी जोडणे.
- ना-नफा संस्थांना संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यासाठी त्यांची मदत करणे.