शाश्वत विकास आणि वातावरणीय बदल यांच्या प्रयोजनार्थ जे काम करू इच्छितात अशा सर्व (स्थानिक आणि जागतिक) कॉर्पोरेट संस्थांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा कॉर्पोरेट हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामध्ये
माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने पर्यावरणीय सुधारणा उपक्रम राबवून त्यांच्या C. S. R. अंतर्गत जबाबदार्या पार पाडण्यासाठी संभाव्य नागरी स्थानिक संस्था / पंचायत राज संस्था यांना एकत्र जोडण्यासाठी कॉर्पोरेट संस्थांना पाठिंबा दिला जाईल.
उत्तम भविष्य निर्माण करण्यासाठी व परिवर्तनाचा भाग होण्यासाठी कॉर्पोरेट्सना सक्षम केले जाईल.